Our Story
अनाथ, निराधार व वंचित वृद्धमातांसाठी माई वृध्दाश्रम येथे मोफत प्रवेश दिला जातो.कारण इथे नफ्यापेक्षा ममतेला आणि नियमांपेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व आहे.
#आश्रमाची_वैशिष्ट्ये
🏢 सुसज्ज चार मजली इमारत
🛏️ स्वतंत्र हॉल,खोल्या, स्वच्छ संडास–बाथरूम
🍲 पौष्टिक व स्वच्छ भोजन व्यवस्था
📺 टीव्ही, प्रोजेक्टर, भव्य हॉलमधील मनोरंजन
🩺 नामांकित डॉक्टरांचे नियमित आरोग्य तपासणी कॅम्प
💫सण, सांस्कृतिक कार्यक्रमांतून हास्याचे क्षण येथे सेवा केली जाते ती स्वतःच्या आईप्रमाणे…
ही अखंड सेवा उभी आहे
माई वृध्दाश्रमाच्या संचालिका -
मीरा वाघमारे (आदर्श शिक्षिका)
🙏 रामदास वाघमारे - संस्था अध्यक्ष (समाजभूषण आदर्श शिक्षक)
यांच्या नि:स्वार्थ समर्पणावर
स्वतःच्या खर्चातून आणि समाजातील दानशूर हातांच्या मदतीने माई वृध्दाश्रम सुरू आहे.
🤝 ही सेवा समाजावरच अवलंबून आहे…
माई वृद्धाश्रमाला कोणतेही शासकीय अनुदान नाही.
म्हणूनच तुमचा एक हातभार, एक मदत, एक शेअर एखाद्या माऊलीच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवू शकतो.
